Monday, February 6, 2023

ऑफिसमध्ये पेपर वाचता वाचता ह्रदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

- Advertisement -

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा पेपर वाचत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कुठे घडली घटना?
राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात हि घटना घडली आहे. 5 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. मृत तरुण हा घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये आला होता. ऑफिसमध्ये आल्यानंतर या तरुणाने पेपर घेतला आणि सोफ्यावर जाऊन बसला. यानंतर पेपर वाचत असताना अचानक या तरुणाला ह्रदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि तो जागेवरच कोसळला.

- Advertisement -

हा तरुण कोसळल्यामुळे (heart attack) ऑफिसमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर बाकी कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!