तरूणाने गरोदर गाईवर अत्याचार केल्याने मृत्यू, पोलिसांनी केली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात एका 29 वर्षीय तरुणाने गरोदर गाईवर अत्याचार केल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील नामखाना ब्लॉकमधील उत्तर चंदनपिडी भागातील आहे. गायीच्या मालकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर संशयित प्रद्युत भुईया याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील उत्तर चंदनपिडी येथील रहिवासी आरती भुईया आणि तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली की, काही दिवसांपूर्वी तिचा शेजारी प्रद्युत भुईया याने त्यांच्या घरामागील गोठ्यात घुसून तिच्या गायीवर क्रूरपणे अत्याचार केला. मध्यरात्रीच्या सुमारास कुकर्म केल्यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने गायीचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आरोपी प्रद्युतविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मंगळवारी त्याला काकद्वीप उपविभागीय न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चंदनपिडी गावातील रहिवासी म्हणाले, “प्रद्युतवर असंख्य आरोप आहेत. त्याने यापूर्वी शेतातील शेळ्या, वाहने आणि भाजीपाला चोरला होता.” “त्या माणसाला त्याच्या अमानवी कृत्याबद्दल पुरेशी शिक्षा झाली पाहिजे,” यापूर्वी जून महिन्यातही अशीच एक घटना समोर आली होती.