औरंगाबाद प्रतिनिधी। वडिलांचे यकृत खराब झाल्याने मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत होत नसल्याने तरुणाने सर्वांच्या पायऱ्या झिझवल्या, उपोषण केले मात्र दाखल घेतली जात नसल्याने आत्महत्येची धमकी देत तरुण थेट दूरदर्शनच्या टॉवरवर चढला त्यानंतर लोक प्रतिनिधी व नागरिकांनी त्यास आश्वस्त केल्यानंतवर तो खाली उतरला.नागरिकांनी उपचारासाठी तरुणाची आर्थिक मदत केली.
मंगेश संजय साबळे या तरुणाच्या वडिलांना यकृताचे आजार होते, त्यासाठी त्याला पैशाची गरज असल्याने त्याने मुख्यमंत्री सह्ययता निधी मिळविण्यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांकडे चकरा मारल्या, मुख्यमंत्री सह्ययता निधी ही मंजूर झाला मात्र निधी ची रक्कम मिळत नसल्याने त्याने उपोषण केले. परंतु कोणीही दाखल घेत नसल्याने अखेर तरुणाने बुधवारी टीव्ही सेंटर परिसरातील दूरदर्शनच्या टॉवर वर चढून मी आत्महत्या करीत आहे असे ओरडत होता, त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
अग्निशमन दलाचे पथकही दाखल झाले, काही केल्याने तरुण खाली उतरत नसल्याने शेवटी अनेक राजकीय व्यक्ती तेथे दाखल झाले खासदार इम्तियाज जलील यांनी देखील तरुणाला आश्वासन दिले, त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तरुणाची वडिलांच्या उपचारासाठी मदत करु असे सांगितले व त्यानंतर तरुण खाली आला पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले, नागरिकनि एक हजार रुपया पासून ते एक लाख रुप्यापर्यंत ची रोख आर्थिक मदत केली. मुख्यमंत्रीचा सहाय्य्यता निधी मिळो अथवा न मिळो परंतु नागरिकांनी दिलेल्या निधीमुळे या तरुणाच्या वडिलांवर उपचार होण्यास नक्कीच हातभार लागणार आहे.