मोठी बहीण रागावल्याने मुलीची आत्महत्या, अकस्मात मृत्यूची नोंद

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी। अभ्यास करीत नसल्याने मोठी बहीण रागवल्याची भावना मनात येऊन छोट्या बहिणीने घराजवळील उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील हडको एन-11 परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

शिल्पा रामकुमार धनगावकर अस आत्महत्या करणाऱ्या युवतीच नाव आहे. शाळेचा अभ्यास करीत नसल्यान शिल्पाची मोठी बहीण तिच्यावर रागावल्यान ती बुधवारी रात्री रागात घराबाहेर पडली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. आज सकाळी हडको परिसरातील बाळासाहेब ठाकरे उद्यानात काही नागरिक मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना शिल्पा पाण्यात तरंगताना दिसली. तिला अग्निशमन दलाच्या मदतीन बाहेर काढण्यात आल. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे .

एका १४ वर्षीय मुलीनं हे आत्महत्येतच पाऊल उचलल्यान परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळं मुलांना आता अभ्यासाबाबत काही बोलव की नाही. हा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झाला आहे.