कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या ; मृतदेह घाटीत सोडून पत्नी गेली निघून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : पती-पत्नीमध्ये होणाऱ्या भांडणाला वैतागून पतीने राहत्याघरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना एन-12 भागात घडली आहे. ही गळफास घेतल्यानंतर पत्नीने पतीला घाटी रुग्णालयात सोडून निघून गेली.
विशाल हिरालाल खाजेकर असे (वय 24) वर्षीय मृताचे नाव आहे.

मृताच्या भावाने दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री विशालचे पत्नी सोबत वाद झाला होते. त्यानंतर विशालने राहत्या घरी गळफास घेतला ही बाब पत्नीला समजल्या नंतर पत्नीने बेशुद्ध अवस्थेतील पतीला घाटी रुग्णालयात नेले. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

पत्नीने सासरच्या लोकांना या घटनेबाबत मोबाईलवरून माहिती दिली. ती निघून गेली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment