औरंगाबाद | कोरोना काळात गेल्या एक वर्षापासून प्रदेश युवक काँग्रेसतर्फे जनसामान्यांना विविध प्रकारची मदत केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना रुग्णांना लागणार्या वैद्यकीय सुविधा यात रेमडिसीवर इंजेक्शन, ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर, ऍम्ब्युलन्स तसेच बाहेरगावच्या लोकांची अंत्यविधीसाठी मदत केली जात आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यापासून दवाखाने अवाच्या सव्वा बिल नागरिकांकडून वसूल करत आहेत ही बाब लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी संपूर्ण राज्याच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले होते जर रुग्णाच्या नातेवाईकांना जास्त बिल वाटल्यास त्यांनी हेल्पलाईन नंबर वर संपर्क करावा व त्यांना मदत करावी.
या मोहिमेनुसार शहरातील सर्व प्रमुख हॉस्पिटलमध्ये जाऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे दवाखाना व नागरिक यात मध्यस्थी करून बिल कमी करून देत आहेत.
आज टीव्ही सेंटर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये कोपरगाव येथून इलाजासाठी आलेल्या पेशंट कडून 10 दिवसांचे 2 लाख घेतल्यावरही अजुन 1 लाख 80,000 भरा व पेशन्ट ला घेऊन जा अशी अडवणूक करत असतांना रुग्णाच्या नातेवाईकांनी युवक काँग्रेसला संपर्क केला व युवक काँग्रेसने त्यांची त उर्वरित रक्कम
पूर्ण माफ करायला लावली. तसेच सेंट्रल नाका येथील अँप्पल हॉस्पिटलमध्ये पेशन्टचा मृत्यू झाला असतांना 1 लाख 80, 000 भरलेले असतांना उर्वरित 90,000 रु साठी पेशन्ट च्या नातेवाईकांना त्रास देण्यात येत होता. तिथे पण जाऊन युवक काँग्रेसने 90,000 माफ केले. दवाखान्यातून अशा प्रकारची लूट जर थांबवली गेली नाही तर युवक काँग्रेस तर्फे त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. या मध्ये हेल्पलाईन मोहिमेत डॉ. निलेश अंबेवाडीकर, मुझफ्फर खान,मोहसीन खान, इंजि मोहसीन, विजय कांबळे, आकाश रगडे हे कार्यकर्ते अविरत कार्य करत आहेत.