पाटण | पाटण तालुका युवक काँग्रेस समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. युवक काॅंग्रेसच्या दिवशी बुद्रुक येथील अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर तर उपाध्यक्षपदी सुपने येथील जगदीश पाटील आणि कुंभारगावचे उदयसिंह चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पाटण युवक काॅंग्रेसची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सरचिटणीस- मयूरेश साळुंखे, मयूर वनवे, स्वप्नील पवार, सागर चव्हाण, तोफिक पटेल. चिटणीस- अक्षय घाडगे, निरंजन धस, सुभाष माने, रोहित चव्हाण, योगेश काकडे, मारुती शेलार. सदस्य- परशुराम पवार, रमेश शेलार, रमेश साळुंखे, जमीर डांगे, रोहित माने, विनोद घाडगे, सचिन साळुंखे, जयदीप कदम, तुषार कांबळे, अक्षय सुतार, प्रशांत पालकर. निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
हिंदुराव पाटील म्हणाले, काँग्रेसची विचारधारा आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंबीर साथ व त्यांच्या माध्यमातून झालेला भरीव विकास कामामुळेच वर्चस्व राहिलेले आहे. युवकांनी काँग्रेसची विचारधारा जपण्यासाठी योगदान द्यावे.”