Satara News : सातारा – सांगली मार्गावर चारचाकी-दुचाकीच्या धडकेत तरुण ठार

Accident News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा-सांगली राज्य मार्गावर खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे चारचाकी व दुचाकीची सोमवारी रात्री जोरदार धडकी झाली. या धडकेत तरुण जागीच ठार झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

प्रकाश पांडुरंग वाघमोडे (रा. देवकरवाडी, निगडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी छाया वाघमोडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश वाघमोडे हे आपली पत्नी छाया हिच्या समवेत दुचाकी (MH11 BN 1637) वरून देवकरवाडीकडे यायला निघाले होते. दरम्यान, गजानन बाळासाहेब नागजे हे चारचाकी (No. MH10 CA0804) ने सावंतपूर वसाहत पलूस किलोस्करवाडीला जात होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव वांगी नजीक असलेल्या माने वस्तीजवळ नागजे यांच्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये प्रकाश वाघमोडे हे जागीच ठार झाले. त्यांची पत्नी छाया वाघमोडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना कराड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

औंध पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन गजानन नागजे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दादासो विष्णू घागरे (रा.जयराम स्वामींचे वडगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे करीत आहेत.