सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा येथील हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत आज धावताना कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी सातारा येथे घडली. राजक्रांतीलाल पटेल (वय 32) असे सदर मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा येथे आज हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरचे राज पटेल हे देखील सहभागी झाले होते. या स्पर्धेत धावत असताना शेवटी राज पटेल अचानक कोसळले. मात्र दहा मिनिटाच्या अवधीनंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.
राजक्रांतीलाल पटेल यांना सध्या रुग्णालयात दाखल केले असून नेमका मृत्यू कशामुळे झाला हे रिपोर्ट मध्ये कळेल असं डॉक्टरांनी सांगितले आहे.