पाटण : डोक्यावरून ट्राॅलीचे चाक गेल्याने 19 वर्षीय युवक जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने पाटण तालुक्यातील कडववाडीचा 19 वर्षीय युवक जागीच ठार झाला. आज दि. 6 मे रोजी शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. अपघातात अभिजीत उमेश चव्हाण (वय-19) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाघजाईवाडी येथून कोपर्डे येथे शेणखताची वाहतूक करणारा ट्रॅक्टर निघाला होता. यावेळी ट्रॉलीवर बसलेला अभिजीत उमेश चव्हाण हा युवक रस्त्यावर पडला. यावेळी ट्रॉलीचे चाक अभिजीतच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.

सदरचा अपघात गमेवाडी गावच्या हद्दीत आंबोळकी शिवारानजीक वळणावर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस दूरक्षेत्रचे मनोहर सुर्वे व सिद्धनाथ शेडगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास चाफळ पोलिस करीत आहेत.

Leave a Comment