लग्नानंतर फोटोशूट करत असताना नववधुने केलेली कृती पाहून सगळेच झाले आश्चर्यचकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सगळीकडे लग्नाचे सोहळे चालू आहेत. या लग्न सोहळ्यांमध्ये नवरीकडचे आणि नवरदेवाकडेच मित्र मैत्रिणी, नातेवाईक मजा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या लग्नसोहळ्यादरम्यान जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा ते मज्जा करताना दिसतात. पण विचार करा, लग्नात वधू-वरांनीच एकत्र मस्ती केली तर काय मज्जा येईल. सगळ्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये वधू आपल्या वराला स्विमिंग पूलमध्ये खाली ढकलत आहे. वधूच्या या कृतीने सर्व पाहुणेही आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वधूने वरासोबत मजा केली
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, लग्न आटोपल्यानंतर वधू-वर स्विमिंग पूलजवळ फोटोशूट करत आहेत. पण तितक्यात वधूला गंमत कळते आणि ती वराला ढकलून तलावात टाकते. यादरम्यान वधूचा तोल बिघडतो आणि तीसुद्धा तलावात पडते. स्विमिंग पूलमध्ये पडल्यानंतर दोघेही खूप आनंदाने हसताना दिसत आहेत. हे सगळे पाहून लग्नातील पाहुण्यांनाही हसू आवरता आले नाही.

नववधूच्या कृतीने जिंकले सगळ्यांचे मन
नववधूने ज्या पद्धतीने आपली नवीन शैली दाखवली ते पाहून सर्वजण प्रभावित झाले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा

वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच; तारीख, वेळ आणि सुतक कालावधी जाणून घ्या

15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल

वेडात मराठे ‘वीर दौडले सात’! शिवरायांच्या पराक्रमी वीरांचा जाज्वल्य इतिहास रुपेरी पडद्यावर झळकणार

Google Recruitment 2022 : IT फ्रेशर्ससाठी भारतात मोठी संधी

हवा भरताना JCB चा टायर फुटला, दोघांचा मृत्यू