कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
तुमच्या वडीलांच्या नावाची विमा पॉलीसी आहे, ती सोडविण्यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगून अवघ्या चार महिन्यात रेठरे खुर्द येथील युवकाला तब्बल 25 लाख 59 हजार 47 रूपांयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काल रात्री उशिरा तालुका पोलिसात त्याबाबतचा गुन्हा नोंद झाला आहे. अजीत सुभाष पवार (वय 29, रा. रेठरे खुर्द) यांची फसवणूक झाली आहे. त्याला फोनवरून विवेक चौधरी, अरविंद मिश्रा आणि विजेंद्र आझाद (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी फसवणूक केल्याचे युवकाने म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अजीत पवार यास पहिल्यांदा विवेक चौधरी यांचा कॉल आला. फेब्रुवारीमद्ये आलेल्या कॉलमध्ये विविक यास तुमच्या वडीलांच्या नावाने एका मोठ्या कंपनीत विमा पॉलीसी आहे. ती सोडविल्यास तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला काही रक्कम भारावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर टप्प्या टप्प्याने अरिवंद मिश्रा व विजेंद्र आझाद यांनाही कॉल करून पवार यास त्याची माहिती दिली. काही रक्कम भरण्यास सांगितले. 5 फेब्रुवारी ते 5 मे 2021 या चार महिन्यात अजीत पवारने थोडी थोडी करत तब्बल 25 लाख 59 हजारांची रक्कम ते तिघेही सांगतील त्या खात्यात भरली.
त्यानंतर मात्र त्यां तिघांनाही त्याच्याशी संपर्क ठेवला नाही. टाळाटाळ होवू लागली. फोनही लागत नसल्याची खात्री झाली. त्यामुळे अजीत पवार याची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्वरीत काल पोलिस ठाणे गाठून तेथे फिर्याद दिली. रात्री उशिरा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. फौजदार अशोक भापकर तपास करत आहेत. त्या प्रकरमात बोगस नावांचा वापर करून अजीत पवार यांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.