हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Youtube Short व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. YouTube ने व्ह्यू काउंटिंग सिस्टममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. You Tube चा हा नवीन नियम ३१ मार्च २०२५ पासून लागू होईल, ज्यामुळे युट्युब क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडिओंचे परफॉर्मन्स अधिक चांगल्या पद्धतीने समजेल आणि त्यांच्या व्हिडिओंना अधिक व्ह्यूज मिळतील .. You Tube चॅनेलची एंगेजमेंट सुद्धा चांगल्या प्रकारे राहील.
याबाबत YouTube ने स्पष्ट केले आहे की आता शॉर्ट्स व्हिडिओ किती वेळा प्ले केला गेला आहे किंवा रिप्ले केला गेला यावर आधारित व्ह्यूज मोजले जातील. पूर्वीप्रमाणे, व्हिडिओ किती सेकंद पाहिला गेला हे याठिकाणी महत्त्वाचे राहणार नाही. कंपनीच्या या निर्णयाचा थेट फायदा क्रिएटर्सना होईल. याच कारण म्हणजे युट्युब वरील शॉर्ट्सना आधीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळतील. YouTube च्या या नव्या अपडेटमुळे टिकटॉक आणि इंस्टाग्राम रील्सप्रमाणे व्ह्यू काउंटिंग अधिक लवचिक होईल.
क्रिएटर्सच्या कमाईवर त्याचा परिणाम होईल का?
आपल्या या नव्या नियमानंतर क्रिएटर्सना आर्थिक फायदा होईल का? हे सुद्धा युट्युबने स्पष्ट केलं आहे. कंपनीचाय दाव्यानुसार, नवीन बदलाचा YouTube पार्टनर प्रोग्राम (YPP) किंवा मॉनेटाइजेशन सिस्टम वर कोणताही परिणाम होणार नाही…. पैसे कमवण्यासाठी जे नियम होते ते आधी सारखेच राहतील. परंतु नव्या नियमांमुळे युट्युब वरील व्हिडिओची एंगेजमेंट चांगली राहील आणि रिच सुद्धा चांगला राहील. त्यामुळे आपली कंटेंट स्ट्रेटेजी आणखी मजबूत होऊ शकते. ज्या लोकांनी नवीन युट्युब चॅनेल काढलं आहे अशा लोकांना याचा फायदा जास्त होण्याची शक्यता आहे .