YouTube चा कठोर निर्णय!! पगारवाढीची मागणी केल्यामुळे 43 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

0
1
YouTube
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच गुगल कंपनीने (Google Company) आपल्या अनेक जुन्या कर्मचाऱ्यांना नारळ देत नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आता कर्मचारी कपातीसंदर्भात युट्युबने मोठा निर्णय घेतला आहे. यूट्यूब म्युझिकच्या (Youtube) एका टीममधील 43 कर्मचाऱ्यांनी चांगले वेतन आणि सुविधा मागितल्यामुळे कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकले आहे. यासंदर्भात यूट्यूबच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे की, या 43 कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी केल्यामुळे युट्युबला याचा राग आला होता. ज्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

…म्हणून कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

खरे तर, सध्या अनेक कंपन्या आर्थिक टंचाईमुळे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासंदर्भात मोठे निर्णय घेत आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे पगार वाढ आणि चांगल्या सुविधांची मागणी केल्यामुळे युट्युबने म्युझिकच्या एका टीममधील 43 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. ज्यावेळी या कर्मचाऱ्यांना समजले की आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे याचा मोठा धक्का त्यांना बसला. परंतु कंपनीने घेतलेल्या या निर्णयाविरोधात ते काहीच करू शकले नाही.

सांगितले जात आहे की, YouTube मधील इतर कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी करू नये यासाठी कंपनीने हे ठोस पाऊल उचलेले आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी यूट्यूब म्युझिक कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांनी चांगले वेतन आणि पगार वाढ यासंदर्भात युनियनला मतदान केले होते. त्यानंतर कंपनीने थेट या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांनी पगार वाढ ची मागणी केल्यानंतर गुगलने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यास साफ नकार दिला आहे.