किशोर जाधव | ‘तीर्थक्षेत्र राशीन’ येथे दरवर्षी दिमाखात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सव सोहळ्यानिमित्त तसेच ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून “जागर समाज परिवर्तनाचा” या नवरात्रोत्सव विशेषांकाचा तृतीय वर्ष प्रकाशन सोहळा युवक क्रांती दल महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आणि मा. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी भवन पुणे येथे खासदार डॉ. कुमार केतकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास ज्येष्ठ गांधीवादी लेखिका वासंतीबाई स्वर, गांधी स्मारक निधीचे अभय छाजेड, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अन्वर राजन, ज्येष्ठ लेखिका डॉ. अंजली सोमण, युक्रांदचे राज्य सहकार्यवाहक आप्पा अनारसे, युक्रांदचे राज्यसंघटक जांबुवंत मनोहर, सायकल यात्री तुषार झरेकर, जागर विशेषांकचे संपादक किशोर जाधव, व्यवस्थापककिरण पोटफोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गांधी सप्ताहाचे उद्घाटन तसेच वासंतीबाई स्वर यांच्या “कस्तुरबा” या पुस्तकाचे प्रकाशन देखील खासदार डॉ. कुमार केतकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जागरच्या पुढील वाटचालीस सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.