परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये तालुका युवा सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर थाली बजाव खुशिया मनाव आंदोलन करण्यात आले . तालुका युवासेनाप्रमुख पांडुरंग शिंदे, युवासेना शहर प्रमुख प्रमोद चाफेकर, युवासेना उप तालुका प्रमुख विजय नखाते, युवासेना उप तालुका प्रमुख बाळु पवार, उप तालुका प्रमुख किसन रनेर, उपशहर प्रमुख राधे गिराम यांनी यावेळी आपली उपस्थिती लावली.
सध्या केंद्र शासनाकडून इंधनाचे व घरगुती गॅस चे दर दिवसेंदिवस वाढवल्या जात आहेत . त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले असून महागाई कमालीची वाढली आहे .सध्या डिझेलचा दर 101 रुपयांच्या वर गेला असून पेट्रोल 117 रुपयापेक्षा अधिक दराने विक्री केली जात आहे .परभणी जिल्ह्यात तर देशातील सर्वाधिक दर आहेत त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत .तर घरगुती गॅसचे दर एक हजार रुपयांच्या घरात पोचले असल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील अर्थकारण बिघडले आहे .
हा सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी पाथरी तालुका युवा सेनेच्या वतीने रविवार 3 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाथरी तहसील कार्यालयाच्या समोर थाली बजाव खुशिया मनाव असे अभूतपूर्व इंधन दरवाढ निषेध नोंदवण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले .यावेळी उपस्थित युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी थाळी वाजवत घोषणाबाजी केली व केंद्र शासना निषेध केला .