अबब!! जि.प. शाळेच्या विद्यार्थिनींना 29 वर्षा पासून एकच रुपया भत्ता; भत्त्यात वाढ करण्याची शिक्षक समितीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना देण्यात येणारा उपस्थिती भत्ता एकोणतीस वर्षानंतरही एक रुपयाचाच आहे . त्यात वाढ करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात आली आहे .

जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींची उपस्थिती कायम रहावी व ही संख्या वाढावी यासाठी 1995 पासून मुलींना उपस्थिती भत्ता शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पहिली ते चौथीच्या वर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थिनीसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुलींना रोज एक रुपया उपस्थिती भत्ता लागू करण्यात आला.

लाभार्थ्यांना 80 टक्के उपस्थिती आवश्यक असते मात्र 29 वर्षांनंतरही या रक्कमेत वाढ झालेली नाही. राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन शिष्यवृत्ती रकमेत वाढ करावी अशी मागणीही ग्रामीण भागातील पालक विद्यार्थी करीत आहेत शिष्यवृत्ती योजना व्यापक करण्यात यावी अशीही मागणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष कैलास गायकवाड यांनी केली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment