बुलडाणा जिल्हयात ऐन सणासुदीला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा प्रतिनिधी। बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सुल्तानपुर, रायगाव, गांधारी, लोणारसह बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या पावसान शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांसोबत विविध पिकांची नासाडी झाली आहे.

येत्या महिनाभरात झेंडूची फुले परिपक्व होऊन शेतकऱ्यांना त्यापासून सणासुदीच्या दिवसांत मोठे उत्पन्न मिळण्याचा विश्वास वाटू लागला होता. गत १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी पावसाची प्रतिक्षाही करू लागले होते. अशातच पावसाने ऐन दसऱ्याच्या आदल्या दिवशी हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले खरे; परंतु तब्बल दीड तास बरसणारा हा पाऊस झेंडूची शेती जमीनदोस्त करून गेला. आता या झाडांना फुले उमलण्याची आशाच राहिली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांच लाखो रुपयांच नुकसान झाल आहे. रायगाव येथील शेतकरी रामेश्वर कपाले यांच्या शेतात झेंडूच्या शेतीतील फुलांचे नुकसान झाले. कापले सांगतात की, ‘काल दिवसभर झालेल्या पावसान बहार आलेल्या झेंडुच फूल गळून पडले.त्यामुळे शेतकऱ्यांच लाखो रुपयांच नुकसान झाल आहे. आता प्रशासनान शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी’ अशी आमची मागणी शासनाला आहे.’

इतर काही बातम्या-