हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zapatlela 3 Update) मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत असतात. यांपैकी एक म्हणजे ‘झपाटलेला’. या सिनेमाचा आता तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘झपाटलेला’मधून दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या हयात नसला तरी स्मरणात आहे. तसेच दोस्तीच्या दुनियेतील हा राजामाणूस आजही मित्रांच्या मनात जिवंत आहे. अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांची लक्ष्या मामासोबतची मैत्री तर सर्वश्रुत आहे.दरम्यान, ‘झपाटलेला ३‘च्या कामात व्यस्त असलेले महेश कोठारे या चित्रपटातून प्रेक्षकांची पुन्हा एकदा लक्ष्यासोबत भेट घडवून देणार आहेत असे समजत आहे.
मराठी सिनेविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर
मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांची दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी अत्यंत सलोख्याची मैत्री आहे. मित्र हयात नसला तरी आठवणीत कायम असल्याने अनेकदा महेश कोठारे आपल्या मुलाखतींमध्ये लक्ष्याबद्दल आवर्जून बोलतात. दरम्यान, महेश कोठारे हे ‘झपाटलेला ३’ या सिनेमाची निर्मिती करत आहेत.
(Zapatlela 3 Update) या निमित्ताने साहजिकच सगळ्यांना अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आली. अशातच एका मुलाखतीदरम्यान महेश कोठारे यांनी सांगितले की, ‘झपाटलेला ३’ या सिनेमासाठी ते लक्ष्मीकांत यांचं AI व्हर्जन तयार करणार आहेत. त्यामुळे मराठी सिनेविश्वात पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
महेश- लक्ष्या पुन्हा एकत्र दिसणार (Zapatlela 3 Update)
अभिनेते महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला ३’च्या निमित्ताने नुकतीच एका प्रसिद्ध वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘लक्ष्या… माझा जिवलग मित्र होता आणि अजूनही आहे. तो आजही माझ्याबरोबर आहे आणि तो मला मार्गदर्शन करतो असं मला वाटतं. मला लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर पुन्हा काम करायची इच्छा आहे. AI चा उपयोग करून मला लक्ष्मीकांत बेर्डेला पुन्हा क्रिएट करायचंय आणि ते मी करणारच.
लक्ष्मीकांतला मी स्क्रीनवर आणणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना महेश – लक्ष्या पुन्हा एकत्र दिसणार आहेत’. (Zapatlela 3 Update) एकंदरच महेश यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘झपाटलेला ३’मध्ये AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्मीकांत यांची भूमिका रिक्रिएट केली जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
हॉलिवूडमध्ये केला होता AI चा प्रयोग
हॉलिवूड सिनेविश्वाच्या गाजलेल्या ‘फास्ट अँड फ्युरियस’ सिनेमाच्या सातव्या भागामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. अभिनेता पॉल वॉकरच्या मृत्यूनंतर या सिनेमात AI च्या माध्यमातून त्याची भूमिका रिक्रिएट करण्यात आली होती. यासाठी पॉलच्या भावाने अभिनय केला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर पॉलचे फोटो लावण्यात आले होते. (Zapatlela 3 Update) ‘फास्ट अँड फ्युरियस ७’ रिलीज होण्यापूर्वी पॉलचा मृत्यू झाल्याने हा प्रयोग करण्यात आला होता. जो अत्यंत यशस्वी ठरला होता.