हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, ऑनलाइन ग्रोसरी डिलीवरी प्लेटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक कैवल्य वोहरा हे भारतातही सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वय अवघे १९ वर्ष आहे. कैवल्य वोहरा यांचे पार्टनर आदित पालिचा हे देखील देशातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. Zepto चे मूल्य आता $900 दशलक्ष आहे.
१९ वर्षीय कैवल्य वोहरा आणि २० वर्षीय आदित पलिचा यांनी २०२१ मध्ये झेप्टो सुरू केले. दोघेही देशातील सर्वात तरुण स्टार्ट-अप संस्थापक आहेत. आजपर्यंत, Zepto ची एकूण संपत्ती $900 दशलक्ष कोटींच्या जवळपास आहे. वोहरा यांची एकूण संपत्ती 1000 कोटींच्या जवळपास आहे. श्रीमंतांच्या यादीत ते 1,036 व्या क्रमांकावर आहे. तर पलिचा १,२०० कोटी संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत ९५०व्या स्थानावर आहेत .
मुंबई स्थित असलेल्या Zepto चा विस्तार 1000 हून अधिक कर्मचारी स्टाफसह देशभरातील 10 प्रमुख शहरांमध्ये आहे. ताजी फळे आणि भाज्या, दैनंदिन स्वयंपाकाच्या आवश्यक वस्तू, दुग्धजन्य पदार्थ, आरोग्य-आणि-स्वच्छता उत्पादने इत्यादींसह 3000 हून अधिक प्रॉडक्ट्स ही कंपनी अवघ्या १० मिनिटांत थेट घरी जाऊन डिलिव्हरी करते. किराणा मालाशिवाय, झेप्टोने एक कॅफे ऑफर देखील सुरु केली आहे जी ग्राहकांना त्यांच्या किराणा व्यवसायाबरोबरच कॉफी, चाय आणि इतर कॅफे वस्तू ऑर्डर करण्याची परवानगी देते.