Zika Virus | पुण्यात 2 रुग्णांना झिका व्हायरसचा संसर्ग; आरोग्य यंत्रणेने केला अलर्ट मोड जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Zika Virus | संपूर्ण जगात काही वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर एक नवीन व्हायरस उदयास येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे पुण्यामध्ये झिका या व्हायरसचे रुग्ण देखील आढळून आलेले आहेत. या दोन रुग्णांमध्ये झिका व्हायरसची लक्षणे आढळून आल्याने आता आरोग्य विभागाकडून पुण्यामध्ये अलर्ट जारी केलेला आहे.

आरोग्य विभागाने जारी केला अलर्ट | Zika Virus

पुण्यातील दोन रुग्णांमध्ये झिका व्हायरसचे (Zika Virus) सौम्य लक्षण आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे या दोघांनाही विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आलेले आहे. आता आरोग्य विभागाने देखील सगळीकडे अलर्ट मोड जारी केलेला आहे. झिका व्हायरसचे रुग्ण ज्या परिसरात आढळले आहेत. त्या परिसरात पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. आणि या परिसरातील अनेक लोकांचे रक्तांचे नमुने देखील घेण्यात आलेले आहेत.

झिका व्हायरसची उत्पत्ती कुठे झाली ?

झिका व्हायरस हा आजार एडिस इजिप्ति डासामुळे होणारा आजार आहे. हेच डास डेंगू देखील पसरवतात. साठलेल्या पाण्यांवर हे डास आढळतात. आणि घरात देखील हे डास अधिक प्रमाणात सापडतात. झिका व्हायरस हा पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातील झिका जंगलात राहणाऱ्या माकडामध्ये आढळला होता. त्यानंतर 1952 साली हा विषाणू माणसाच्या शरीरात देखील सक्रिय झाला. त्याचप्रमाणे आफ्रिका आणि आशियाच्या विषुवृत्तीय प्रदेशात 1950 पर्यंत हा होता.

झिका व्हायरसची लक्षणे | Zika Virus

झिका व्हायरसने आता मानवी शरीरात देखील आक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. या व्हायरसचे आपल्या शरीरात आक्रमण झाल्यानंतर लोकांना अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे उठणे, डोळे येणे यांसारखी लक्षणे दिसतात. जर तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण सौम्य प्रमाणात जरी आढळत असले, तरी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.