हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) आणि मॅकडोनाल्डस् (McDonald’s) यांना मांसाहारी पदार्थांची डिलिव्हरी केल्यामुळे 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका ग्राहकाला शाकाहारीऐवजी मांसाहारी पदार्थ डिलिव्हरीमध्ये दिल्यानंतर जोधपूरच्या ग्राहक न्यायालयाने या दोन्ही कंपन्यांवर कारवाई ही केली आहे. त्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशाविरोधात झोमॅटो अपील करणार असल्याचे म्हटले जात आहे.
1 लाख रुपयांचा दंड
आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती झोमॅटोने शुक्रवारी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत ऑर्डर मॅकडोनाल्डद्वारे वितरित करण्यात आली होती. त्यामुळे जोधपूर न्यायालयाने ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्याबद्दल झोमॅटो आणि मॅकडोनाल्डस्’ला 1 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितला आहे. तसेच कायदेशीर प्रक्रियेचा खर्च देखील दोन्ही कंपन्यांना उचलण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना 1 लाख 55 हजार रुपये भरावे लागतील.
दरम्यान, जोधपूर न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात आता झोमॅटो अपील करणार आहे. या प्रकरणात झोमॅटोचे म्हणणे आहे की, झोमॅटो ही फक्त फूट डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. सेवेतील कोणतीही कमतरता, ऑर्डरचे चुकीचे वितरण आणि गुणवत्तेसाठी रेस्टॉरंट असते. याप्रकरणात देखील तेच झाले आहे. ग्राहकाने झोमॅटोवरून मॅकडोनाल्डच्या शाकाहारी पदार्थांची ऑर्डर दिली होती. मात्र ही ऑर्डर त्यांच्याकडून चुकीची देण्यात आली. ज्यानंतर या दोन्ही कंपन्यांविरोधात ग्राहकाने तक्रार केली.