Zoo In Jath : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत उभारण्यात येणार नवीन प्राणी संग्रहालय

Zoo In Jath
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Zoo In Jath। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असताना आता याच पश्चिम महाराष्ट्रात एक नवीन प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची बातमी समोर येतेय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात हे प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्राणी संग्रहालयात ४०० प्रकारचे प्राणी असतील असं पडळकर यांनी सांगितलं. येव्हडच नव्हे तर जो बिबट्या लोकांना त्रास देतोय त्या बिबट्याला आम्ही आमच्या प्राणी संग्रहालय टाकणार आहोत आणि त्याच्यावर तिथे उपचारही करू असे पडळकर म्हणाले.

याबाबत गोपीचंद पडळकर यांनी माहिती देताना म्हंटल कि,पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले दुसरे सर्वात मोठं प्राणी संग्रहालय जत तालुक्यात (Zoo In Jath) होणार आहे. जवळपास 100 एकरांमध्ये 150 कोटीचा या प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव असणार आहे. या प्राणी संग्रहालयात सुमारे 400 प्रकारचे वेगवेगळे प्राणी असतील. तसेच बिबट्यांची देखील जत तालुक्यातील या प्राणी संग्रहालयात राहण्याची सोय करू. राज्य सरकारची या प्राणी संग्रहालयाला मान्यता मिळालेली असून आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू आणि पुढच्या दोन-तीन महिन्यामध्ये मंजूर करून घेऊ. जो बिबट्या लोकांना त्रास देतोय त्या बिबट्याला आम्ही आमच्या प्राणी संग्रहालय टाकणार आहोत आणि त्याच्यावर तिथे उपचारही करू असे पडळकर म्हणाले.

प्राणीसंग्रहालयाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव (Zoo In Jath)

हे प्राणी संग्रहालय (Zoo In Jath) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उभारण्यात येईल. पुढील एक ते दीड वर्षात हे प्राणी संग्रहालय तयार व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. 100 एकर मध्ये प्राणी संग्रहालय असं पश्चिम महाराष्ट्रात इतर कुठेही बघायला मिळणार नाही त्यामुळे या प्राणी संग्रहालय नंतर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन मोठ्या प्रमाणावर याठिकाणी येथील आणि जत आणि आसपासच्या परिसराला त्यामुळे मोठी चालना मिळेल असा विश्वासही गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला..