हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्या पालकांची मुले मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहेत. त्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विविध कारणास्तव राज्यातील प्राथमिक शिक्षक हे आज म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी एका दिवसाची सामूहिक रजा घेणार आहेत. आणि आंदोलनावर जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील जवळपास पावणे दोन लाख शिक्षक रजा घेणार आहेत. त्यामुळे आज राज्यातील जवळपास 40 हजार शाळा बंद राहणार आहेत. याआधी नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीची निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता सर्व राज्यातील शिक्षक संघटनांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला. परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
सरकारने घेतलेले निर्णयानुसार जर सुधारित शिक्षक संघ मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29000 पेक्षा जास्त शिक्षकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. शासनाने घेतलेले हे दोन्ही निर्णय लवकरात लवकर रद्द करावेत. यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी त्या एकवटलेल्या आहेत. या संदर्भात आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर देखील सकारात्मक चर्चा करत आहेत. परंतु याबाबत अजून कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या आंदोलनात 25 सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व शिक्षक हे रजा टाकणार आहेत. आणि मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. असे त्यांनी आवाहन दिलेले आहे. शिक्षकांचा हा मोर्चा नगरपरिषद गांधी विद्यालय भंडारा येथून 12 वाजता निघणार आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यानंतर पोहोचणार आहे.
ज्या शाळांमध्ये मुलांची संख्या कमी आहे, त्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती करणे विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारे प्रशासकीय कामे या सगळ्या मुद्द्यांना विरोध करण्यासाठी आज शिक्षक हे आंदोलन करणार आहेत. आणि या आंदोलनामुळेच राज्यातील अनेक शाळा आज बंदर राहणार आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हाट्सअप ग्रुप लेफ्ट होणे, तसेच काळी फीत लावून काम करणे. अशा प्रकारचे विरोध दाखवण्यात आले होते. परंतु याचा काही परिणाम न झाल्याने आता पुन्हा एकदा शिक्षकांनी एका दिवसाची रजा घेऊन आंदोलन पुकारले आहे.
यामध्ये शिक्षकांनी सांगितले आहे की, 15 मार्च 2024 संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा तसेच विद्यार्थ्यांना आधार कार्ड संबंधाने अडचण लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण रद्द करावे. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावण्यासाठी जास्त उशीर करू नये. तसेच मोफत गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना राबवू नये. ज्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाले नाहीत त्यांना स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात. तसेच प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती रद्द करावी. शिक्षकांना आश्वासन प्रगती योजना लागू करावी यांसारख्या अनेक मागण्याचा समावेश आहे.