Zydus Cadila सरकारच्या लसीची मागणी पूर्ण करू शकणार नाही, ऑक्टोबरपर्यंत तयार केले जाणार फक्त 1 कोटी डोस

moderna vaccine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । Zydus Cadila च्या तीन डोस वाल्या लसीला शुक्रवारी DGCI ने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. या मंजुरीमुळे, आता भारतासह कोरोनाविरोधी लसींची (Covid-19 Vaccine) एकूण संख्या सहा झाली आहे. आता फार्मा कंपनीने शनिवारी सांगितले आहे की,” ते ऑक्टोबरपर्यंत दरमहा 1 कोटी डोस तयार करतील.”

कंपनीने सांगितले की,” डिसेंबर-जानेवारी महिन्यात लसीची उत्पादन क्षमता तीन ते पाच कोटी दरमहा वाढवण्याची योजना आहे.” यापूर्वी भारत सरकारने फार्मा कंपनीकडून ऑगस्टमध्ये पाच कोटी डोसची मागणी ठेवली होती, पण आता हे अजून शक्य नाही असे Zydus कडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. ते ऑक्टोबरपर्यंत दरमहा 1 कोटी डोस तयार करू शकतील.

लसीच्या किंमतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल
Zydus च्या नवीन लसीची किंमत किती असेल, यावर कंपनीने सांगितले की,” सध्या ते विचाराधीन आहे पण किंमत येत्या काही दिवसात ठरवली जाईल.” Zydus Cadila च्या लसीआधी भारताला सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लस यासह एकूण पाच लस मिळाल्या होत्या.

Zydus ने डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीच्या सहकार्याने ही तीन डोस DNA आधारित लस विकसित केली आहे. मंजुरी मिळण्यापूर्वी या लसीची तीन टप्प्यांत चाचणी केली गेली. सुमारे 28000 हजार लोकांवर याची चाचणी घेण्यात आली आणि ही लस विषाणूविरूद्ध 66 टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरली आहे.