अभिनेत्री कंगना रणौतनं घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रणौत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाली आहे. नुकतंच कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. त्यातच मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. त्यावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगना व राज्यपाल कोश्यारी यांची भेट होत आहे.

शिवसेना विरुद्ध कंगना या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

You might also like