आपल्याकडे SBI Card असेल आणि आपण पेमेंट केले नाही तर आता बँक उचलेल ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Card आता आपल्या ‘दोषी’ ग्राहकांसाठी Restructuring योजनेंतर्गत एनरोलमेंट प्रक्रिया सुरू करणार आहे. यात अशा ग्राहकांचा समावेश असेल ज्यांनी लोन मोरेटोरियम संपल्यानंतरही कोणतीही देय रक्कम भरलेली नाही. RBI च्या रिस्ट्रक्चरिंग स्कीम (RBI Restructuring Scheme) किंवा बँकेच्या रिपेमेंट योजनेंतर्गत याचा समावेश केला जाईल जेणेकरुन त्यांना RBI साठी अधिक वेळ मिळेल. SBI Card च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

SBI Card चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वि कुमार तिवारी म्हणाले की, मोरेटोरियममुळे ग्राहकांनी पहिल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात पैसे दिले नाहीत आणि कंपनीने त्यांना Standard Account म्हणूनच मानले. यानंतर, मोरेटोरियमच्या दुसर्‍या कालावधीत कंपनीने ग्राहकांसाठी एनरोलमेंट प्रक्रिया सुरू केली. यामध्ये बर्‍याच ग्राहकांनी त्यांची नोंदणी केली नाही. हेच कारण होते की, मोठ्या संख्येने ग्राहक मोरेटोरियमच्या कक्षेत येऊ शकले नाहीत. त्यातील काहींनी रिपेमेंट केले तर काहींनी केले नाही. ज्यांनी रिपेमेंट केलेले नाही, आम्ही त्यांनाच दोषी ग्राहक मानत आहोत.

थकबाकी भरण्यासाठी अधिक वेळ आणि चांगला व्याज दर
गेल्या महिन्यात पदभार स्वीकारणाऱ्या तिवारी यांनी वृत्तसंस्था PTI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘आम्ही आता या दोषी ग्राहकांची RBI Restructuring Scheme किंवा आमच्या रिपेमेंट योजनेंतर्गत नोंद करीत आहोत जेणेकरून त्यांना थकबाकी भरण्यासाठी जास्तीत जास्त वेळ आणि चांगला व्याज दर मिळेल. कंपनीच्या मते, त्यांच्याकडे मेमध्ये 7,083 कोटी रुपये होते, ते जूनमध्ये घसरून 1,500 कोटी रुपये झाले.

SBI रिपेमेंट योजनेंतर्गत मिळेल लाभ
जे ग्राहक RBI Restructuring Scheme चा लाभ घेत नाहीत, ते SBI Card रिपेमेंट योजनेची निवड करतील तर, त्यांना विशेष फायदा मिळेल. SBI Card अशा ग्राहकांचा रिपोर्ट क्रेडिट स्कोअरिंग एजन्सी सिबिलला पाठवणार नाही.

तिवारी म्हणाले की, रिस्ट्रक्चरिंग प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये अनेक खाती एनरोल करावे लागतील. RBI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनी त्यावर 10 टक्के तरतूद घेईल. या व्यतिरिक्त काही अशी खाती देखील आहेत जी महामारीमुळे NPA झाली आहेत. त्यासाठी अतिरिक्त तरतूद केली जाईल. दुसर्‍या आणि तिसर्‍या तिमाहीत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.

पहिल्या तिमाहीत 393 कोटी निव्वळ नफा
एप्रिल ते जून या तिमाहीत SBI Card चा 393 कोटी रुपयांचा नफा झाला. मात्र, या काळात कंपनीचे उत्पन्न 2,304 कोटी रुपयांवरून 2,196 कोटी रुपयांवर आले आहे. परंतु आता NPA ची वाढती संख्या पाहता असे म्हटले जाऊ शकते की, SBI साठी दुसरा तिमाही आव्हानात्मक असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment