मुंबई प्रतिनिधी । आता एटीएम कार्डाशिवाय पैसे काढणं सोपं झालंय. SBI नंतर आणखी एक सरकारी बँक बँक ऑफ इंडियानं ही सुविधा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियाचे ग्राहक QR कोड स्कॅन करून ATM मधून पैसे काढू शकतात. म्हणून बँकेनं एटीएममध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)द्वारे क्युआर कोडचं नवं फीचर जोडलंय. ही सुविधा मुंबई, दिल्ली आणि चेन्नई इथे सुरू केलीय. पुढच्या सहा महिन्यात अख्ख्या देशात ही योजना सुरू केली जाईल.
AGS Transact Technologies या तंत्राद्वारे ही सेवा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना फ्राॅडपासून वाचवण्यासाठी ही सेवा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियाप्रमाणे SBI ही सेवा देतंय.
असे काढा पैसे ?
1. पैसे काढण्यासाठी कार्ड आणि पिनची गरज नाही. तुम्ही जास्तीत जास्त 2 हजार रुपये काढू शकता. SBI च्या या सेवेचं नाव YONO Cash आहे.2. योनो डिजिटल प्लॅटफाॅर्म 85 ई काॅमर्स कंपन्यांना सेवा देतं.
3. SBI नं हे 2017मध्ये लाँच केलं होतं. फेब्रुवारी 2019पर्यंत YONO APP 1.8 कोटी लोकांनी डाऊनलोड केलं. 70 लाख ऍक्टिव्ह युजर्स आहेत.
4.YONO APP मध्ये पैसे काढण्यासाठी 6 डिजिट पिन सेट करायला हवा.
5. या ट्रॅन्झॅक्शनसाठी मोबाइलवर SMS द्वारे 6 डिजिट रेफरन्स नंबर मिळेल. त्यानंतर 30 मिनिटांच्या आत ATMमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढू शकता.
- तिथे गेल्यावर तुम्ही 6 डिजिटचा पिन आणि रेफरन्स नंबर टाका. तुमच्या हातात पैसे येतील. SBIनं सांगितलं की डेबिट कार्डामुळे होणारे फ्राॅड होणार नाहीत.