व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राजनाथ सिंह यांचं चीन मुद्द्यावरील भाषण म्हणजे एक क्रूर थट्टा- ओवेसी

नवी दिल्ली । केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारत-चीन संघर्षाबाबत संसदेत भूमिका मांडली. भारत-चीन संघर्षाबाबत राजनाथ सिंह यांचं भाषण झालं त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी राजनाथ सिंह यांच्या भाषणावर टीका केली आहे आज राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केलेलं भाषण म्हणजे एक क्रूर थट्टा असल्याचे ओवेसी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावे देशाची क्रूर थट्टा सुरु आहे असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकार हे इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यात माहीर आहे. आज राजनाथ सिंह यांनी असं वक्तव्य केलं की आपण सगळ्यांनी आपल्या सुरक्षा दलांसोबत असलं पाहिजे. संसदेचा प्रत्येक सदस्य सुरक्षा दलांसोबतचं आहे याबाबत माझ्या मनात काहीही शंक नाही असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मला सदनात बोलण्याची संमती देण्यात आली नव्हती. जर ती मिळाली असती तर मी माझी भूमिका नक्की मांडली असती असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राजनाथ सिंह ?
“सीमा प्रश्न एक जटिल मुद्दा आहे हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे तसेच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. LAC जवळ दोन्ही देश सैन्याची तैनाती कमी ठेवतील असा १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारात उल्लेख आहे. सीमा प्रश्नी जो पर्यंत तोडगा निघत नाही, तो पर्यंत LAC चा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही असे सुद्धा करारात म्हटले आहे” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.