पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला. या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी आज अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देण्याचं कारण अद्याम मला समजलेलं नसून त्यांच्याशी माझी याबाबत चर्चा झालेली नाही. इडीच्या चौकशीमूळेच अजितने राजीनामा दिला असावा असा माझा अंदाज आहे असे मत पवार यांनी व्यक्त केलंय. पाहुयात लाय म्हणालेत शरद पवार.