अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण; पहा संभाव्य खातेवाटप यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार होऊन दोन दिवस होउन देखील अजून खातेवाटप झालेले नाही आज संध्याकाळी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात दोन दिवस झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर खात्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ व नियोजन विभाग मिळू शकेल, असे सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि पर्यटन विभाग मिळू शकेल. कृषी विभागासंदर्भात सध्या कॉंग्रेस व शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेसला कृषी खाते हवे आहे, परंतु शिवसेना कृषी खाते देण्यास तयार नाही.

पहा संभाव्य खाते वाटप

अजित पवार – अर्थ व नियोजन

अनिल देशमुख – गृह

जयंत पाटील – पाटबंधारे

दिलीप वळसे पाटील – कामगार व उत्पादन शुल्क

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा

आदित्य ठाकरे – पर्यावरण आणि पर्यटन

एकनाथ शिंदे – नगरविकास

सुभाष देसाई – उद्योग

बाळासाहेब थोरात – महसूल

अशोक चव्हाण – राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यासह पीडब्ल्यूडी

अमित देशमुख – शिक्षण किंवा ऊर्जा

नितीन राऊत – ऊर्जा

यशोमती ठाकूर – महिला आणि बाल विकास

नवाब मलिक – अल्पसंख्याक व्यवहार

जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण