प्रथम पुण्यपुण्यस्मरण विशेष । भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी ज्या काळात भाजप चे हाताच्या बोटावर मोजता येतील केवळ इतके लोकप्रतिनिधी निवडून यायचे अशा काळात पक्षाची मोट बांधली.
अटलजींबाबत तुम्हाला माहीती नसलेल्या दहा गोष्टी खालीलप्रमाणे –
१. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म एका सामान्य शिक्षकाच्या घरात २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला.
२. ग्वाल्हेर येथे शालेय शिक्षण पुर्ण करुन त्यांनी व्हिक्टोरिया काॅलेजातून राज्यशास्त्रात मास्टरची पदवी प्राप्त केली.
३. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात अटलजींनी सक्रीय सहभाग घेतला.
४. एक संवेदनशिल कवी, प्रभावी वक्ता आणि पत्रकार म्हणुन त्यांनी आपल्या करिअरची सुरवात केली.
५. पुढे त्यांची भारतीय जनसंघाशी संबंध आला. भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणुन त्यांनी महत्वाची भुमिका बजावली.
६. अटलबिहारी वाजपेयी कायम भाजपाशी एकनिष्ठ राहीले. भाजपाला जनमाणसात पोहिचवण्यासाठी त्यांनी काम केले.
७. वाजपेयी एकुण दहा वेळा खासदार म्हणुन संसदेत निवडून गेले. त्यातील दोन वेळा ते राज्यसभेवर गेले.
८. वाजपेयी यांना भारतरत्न आणि पद्मभुषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
९. अटलबिहारी वाजपेयी १९९६ रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले. आपल्या कामाने त्यांनी स्वत:ची वेगळी छबी निर्माण केली. परंतू केवळ १३ दिवसांत त्यांचे सरकार कोसळले.
१०. १९९८ रोजी वाजपेयी पुन्हा पंतपचरधान झाले. यावेळी त्यांनी ५ अणुचाचण्या यशस्वी केल्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लाहोर दिल्ली अशी बस सेवा सुरु करुन भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यास हातभार लावला.
इतर महत्वाचे –
मोठी बातमी, अटलबिहारी वाजपेयीं यांचे निधन
अटल बिहारी वाचपेयींच्या नावावरील हे राजकीय रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नाही
अटलजींनी मला भावासारखे प्रेम, लता मंगेशकरांनी केल्या भावना व्यक्त