अमित शहा देशाचे लोहपुरुष, मुकेश अंबानीची स्तुतीसुमने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र | भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच देशाचे लोहपुरुष आहेत सच्चे कर्मयोगी आहेत असं म्हणत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अमित शाह यांची स्तुती केली आहे. खरंतर लोहपुरुष ही उपमा खरंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना देण्यात आली आहे.
लोहपुरुष या नावानेही सरदार पटेल यांना ओळखले जाते. नेमकी हीच उपमा मुकेश अंबानी यांनी अमित शाह यांना दिली आहे. गुजरातच्या गांधीनगर येथील पंडित दिनदयाल पेट्रोलियम युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात ही उपमा मुकेश अंबानी यांनी अमित शाह यांना दिली ” अमितभाई तुम्ही सच्चे कर्मयोगी आहात, तुम्ही आपल्या देशाचे लोहपुरुष आहात. गुजरातला आणि देशाला तुमचा अभिमान वाटतो आहे.” या कार्यक्रमाला अमित शाह यांचीही उपस्थिती होती. ” भारत सध्या सुरक्षित हातांमध्ये आहे याबाबत माझ्या मनात छोटीशीही शंका नाही.
तुम्ही भारतासाठी जे स्वप्न पाहता आहात ते नक्की पूर्ण होईल. तुम्ही मोठी स्वप्नं पाहण्यासाठी घाबरत नाही ती पाहता आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट करता.” असेही मुकेश अंबानी यांनी अमित शाह यांना उद्देशून म्हटले आहे.आपल्या भाषणात मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोदी चांगले प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.