आणि बिबट्या चक्क संडासात लपला होता..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेण मुलाणी

पाटण तालुकयातील चाफळ जवळील डेरवण गावात बिबट्या चक्क संडासात येऊन बसल्याचं समोर आलंय. सायंकाली ७ वाजता घराच्या समोर असलेल्या अंगणातील संडासात बिबट्या बसला असल्याचं घर मालकाच्या लक्षात आलं. मालकाने तातडीने संडासचे दार बाहेरून बंद केले व वनक्षेत्रपाल याना फोन करून कल्पना दिली.

वनखाते पिंजऱ्यासह तातडीने घटनास्थळी पोहचुन पिंजरा लावुन रात्री उशीरा बिबट्यास अगदी अलगदपणे पिंजऱ्यात बंदिस्त करणयात यश आले

पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पाहणी केली व पकडलेला बिबट्या हा सुस्थितीत असल्याचे सांगितले. पकडलेला बिबट्या हा पूर्ण वाढलेला नर असून सुमारे 3 वर्षाचा आहे,अतिशय आक्रमक व तब्यतीने अगदी धुष्टपुष्ट आहे.
बिबट्या वनखात्याच्या ताब्यात असुन त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले जाणार आहे.

Leave a Comment