आमदार संग्राम थोपटेंना मंत्रिपद नाकारल्याचे तीव्र पडसाद; कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनात तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी न दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केली. आमदार संग्राम थोपटे यांना मंत्री पद मिळणार नाही हे स्पष्ट होताच काल काँग्रेस पक्षाचा फलक जाळून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. आज कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस भवनालाच लक्ष्य केले. काँग्रेस भवनातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात संतप्त कार्यकर्ते जमा झाले होते.

संग्राम थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. मोदी लाटेत देखील त्यांनी बाजी मारली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात आमदार संग्राम थोपटे यांना संधी मिळणार अशी चर्चा होती. मात्र अखेर संग्राम थोपटे यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. काँग्रेसकडून १० आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना देखील मंत्रिपद देण्यात आले नाही.