हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल ची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा दुबई मध्ये आयोजित केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलची तयारी पाहून आनंदी झाले आहेत. ते सोमवारी युएईच्या शारजाह स्टेडियमवर दाखल झाले. कोरोनामुळे आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. सर्व 60 सामने दुबई , अबूधाबी आणि शारजाह येथे होतील.
गांगुलीने स्वतः शारजाह स्टेडियमवर जाऊन कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी जैव-सुरक्षित वातावरणात होणार्या स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. ते म्हणाले की, ‘युवा खेळाडू या मैदानावर खेळण्यास उत्सुक आहेत, जिथं सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूंनी इतिहास रचला आहे.’
अलीकडेच शारजाह स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. यात कृत्रिम छप्पर घालणे, रॉयल सुट श्रेणीसुधारित करणे तसेच कॉमेंट्री बॉक्स आणि आतिथ्य बॉक्स कोरोनाशी संबंधित नियमांनुसार तयार केले गेले आहेत.