दिल्ली : व्हिडिओकाॅन समुहाला देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणामधे आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बँकेने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. व्हिडिओकाॅन समुहाला कर्ज देताना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी आपले कौटुंबिक हितसंबंध सांभाळले असल्याचा अारोप त्यांच्यावर आहे. सध्या चंदा कोचर यांची अंतर्गचौत चौकशी सुरु असून चौकशी पुर्ण होईपर्यंत त्या बँकेच्या सर्व व्यवहारांपासून दुर राहतील असा निर्णय आयसीअायसीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेचे मुख्य परिचालन अधिकारी म्हणुन संदीप बक्षी यांची नेमणुक करण्यात आली आहे. याआधी समुहातील आयुर्विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन काम पाहत असलेले संदीप बक्षी हे मंगळवारपासून बँकेचा सर्व व्यावसायीक व्यवहार पाहतील असे सांगण्यात आले आहे. बँकेची पुढील वाटचाल काय असणार यात अनिश्चितता वाटत असल्याने तीन मोठ्या परदेशी कंपन्यांनी आयसीआयसीआय बँकेतील आपला शेअय काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. चंदा कोचर नियोजित रजेवर असून त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कायम राहतील असे बँकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे.