HELLO महाराष्ट्र| ‘इंडियन प्रिमीअर लीग’ म्हणजेच ‘आयपीएल’ची प्रसिध्दी सर्वसामन्यांपासून कधीच लपून राहिलेली नाही. आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा नवीन रोमांचांनी भरलेला असतो. आगामी आयपीएल च्या पार्श्वभूमीवर आता डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामचा लिलाव 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे पार पडणार आहे.
या लिलावामध्ये आयपीएल मधील सर्व संघ सहभागी होणार आहेत. मात्र भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मात्र मोठा धक्का बसण्याची शकयता आहे. आगामी लिलावात विराट कोहलीचा आरसीबी संघ एकही मोठा खेळाडू खरेदी करू शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे पैसेच नसल्याचे समोर आले आहे.
पुढील महिन्यातील 19 डिसेंबरला होणाऱ्या लिलावात बंगळुरू संघाकडे दोन कोटी रुपयेही नाही आहेत. त्यामुळं बंगळुरू संघ कोणताही मोठा खेळाडू खरेदी करू शकणार नाही आहे. त्यामुळे संघाची अडचण वाढली आहे. दरम्यान आयपीएल लिलावात प्रत्येक संघाकडे गेल्या वर्षी उरलेली एक ठराविक रक्कम असते. यात आरसीबीकडे फक्त 1.80 कोटी रुपये आहेत. त्यामुळं कमीत कमी 2 कोटी बेस प्राईज असलेल्या खेळाडूंनाही बंगुळरू संघ विकत घेऊ शकणार नाही आहे.