अहमदनगर प्रतिनिधी | इंग्रजीमध्ये फाडफाड बोलून एका दुकानदाराला महिलेने आणि त्याच्या सोबत आलेल्या पुरुषाने 36 हजार रुपयांना टोपी घातली आहे. हा सर्व प्रकार दुकानातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई येथील स्वाती कृषिसेवा केंद्र येथे हा सर्व प्रकार घडला असून कृषिसेवा केंद्राचे मालक उत्तम पटारे यांनी सोनई पोलिसात फिर्याद दिल्यावरून अनोळखी महिला आणि पुरुष आशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे जोडपं दुकानात आल्यानंतर त्यांनी वस्तू खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानातील पैशांचा कप्पा खोलायला लावला, त्यानंतर आपल्याकडील नोट दाखवत ही नोट जास्त रकमेची असल्याचं वृद्ध दुकानदारास सांगितलं. दुकानदार पैसे देण्याच्या मनस्थितीत नसताना त्याच्याकडून पैसे हिसकावून घेत त्याला ते समजावू लागले आणि काही वेळातच त्यांनी दुकानातून पोबारा केला. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन भामट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.