हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हक असे मानतो की वेस्ट इंडिजचा महान फलंदाज विव्ह रिचर्ड्ससारखी आक्रमकता सध्याच्या फलंदाजामध्ये कोणाकडेही नाही आहे.तो म्हणतो की याक्षणी हाय स्कोअरिंग सामने होत आहेत, टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी होते, परंतु असे असूनही विव्ह रिचर्डसच्या फलंदाजीसारखे काही नाही. यामुळेच इंझमाम त्यांना आपला हीरो मानतो.
इंजमामने त्याच्या एका YouTube व्हिडिओमध्ये विव्ह रिचर्डसच्या फलंदाजीची आठवण करुन दिली, “मी एकदा त्याच्याबरोबर क्लबच्या सामन्यात फलंदाजी करायला गेलो होतो.” त्यावेळी तो निवृत्त झाला होता,आणि मी नुकताच पाकिस्तान संघात दाखल झालेलो. त्या काळात विव्ह रिचर्डसने मला हसत विचारले आणि चल बघुयात आपल्यापैकी सर्वात मोठा षटकार कोण मारतोय हे पाहूया.
यावर इंझमाम म्हणाला, “मला वाटले की ते निवृत्त झाले आहे आणि मी अजूनही तरूण आहे. म्हणूनच आपणच लांब षटकार ठोकू पण असे काही झाले नाही, जेव्हा विव्ह रिचर्डसने जेव्हा पहिला जोरदार षटकार लगावला तेव्हा तो स्टेडियमच्या शेजारी असलेल्या कार पार्किंगमध्ये गेला होता.यानंतर मीदेखील एक षटकार ठोकला जो ड्रेसिंग रूमची छप्पर ओलांडून स्टेडियमच्या बाहेर पडला .
तो म्हणाला, “यानंतर मी हसलो आणि त्याला सांगितले की माझा षटकार तुमच्यापेक्षा लांब गेला परंतु तो म्हणाला की मी अजून आऊट झालेलो नाही.” त्यानंतर, मग काय त्याने असे तीन षटकार मारले कि ते ड्रेसिंग रूमच्या छप्पर वरून स्टेडियमच्या शेजारीच असलेल्या घरात पडले.
विव्ह रिचर्डसच्या आक्रमक फलंदाजीचा फॅनझालेला इंझमामला असा विश्वास आहे की त्याच्यासारखा निडर फलंदाज आजपर्यंत क्रिकेट विश्वात झालेला नाही.त्याने एक-दोन, तीन धावा घेतल्या नाहीत,त्याने फक्त चौकार लगावत सामना जिंकण्याची किमया साधली.
तो म्हणाला, “विव्ह रिचर्डस जगातील एकमेव असा फलंदाज होता जो विरोधी संघातील कमकुवत गोलंदाजाला नव्हे तर मुख्य गोलंदाजालाच लक्ष्य करुन धाव बनवायचा त्यांची हीच निर्भयता विरोधी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवत असे”. यासह इंझमामने पाकिस्तान सुपर लीग संघ क्वेटा ग्लेडिएटरला सल्ला दिला की, संघातील खेळाडूंनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे, त्यांना हि एक मोठी संधी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.