उस्मानाबाद प्रतिनिधी| अनेक नेत्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग-आउटगोइंगचे उस्मानबाद जिल्ह्यात पण पाहायला मिळाले. राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे.
त्याचा प्रत्यय म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि डझनभर जिल्हा परिषद सदस्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. या सर्वांनी राजीनामे दिल्यानंतर हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित या सर्वानी शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेतला. त्यामुळे काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेने काँग्रेसचा जिल्ह्याचा सेनापतीच फोडल्याने भूम परंडा आणि वाशी तालुक्यात काँग्रेसचा गड ढासळला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत काँग्रेसची वाताहत तर होणार नाही न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.