‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक एटीएस मध्ये

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। मुंबई पोलिस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिस निरीक्षक दया नायक यांची सोमवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) बदली करण्यात आली आहे. खार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या नायक यांची प्रशासकीय कारणातून एटीएसमध्ये बदली झाली आहे.

गेल्या काही वर्षांत एटीएसचा दबदबा वाढत असतानाच नायक यांच्या बदलीने त्यात वेगवेगळे तर्क लढविण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वीच नायक पुन्हा पोलिस दलात रुजू झाले आहेत. अंबोली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय राहिली. १९९५ च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या नायक यांची एटीएसमध्ये झालेली पोलिस दलात बदली चर्चेची ठरली आहे. त्यामुळे, आता नायक यांच्या नव्या कामगिरी, जबाबदारीकडे सर्वांचे लक्ष लागले.

दरम्यान मुंबई पोलिस दलात असताना २००६ साली दया नायक यांना गुन्हगारी जगताशी संबंधांप्रमाणेच ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या आरोपांवरून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नायक यांच्या संपत्तीची चौकशी केली. त्यात दोषी न आढळल्याने त्यांना २०१२मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांची नागपूर येथे बदली करण्यात आली. पण ते त्या ठिकाणी ड्युटीवर हजर न झाल्याने त्यांच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई झाली होती. गृह विभागाने निलंबनाची कारवाई मागे घेतल्याने त्यांची नेमणूक मुंबई येथे झाली होती.