औरंगाबाद महापालिका आयुक्त महापौरांच्या इशाऱ्यावर नाचतात, खासदार जलील यांचा आरोप

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबाद शहरात अनेक समस्या आहेत. त्यापैकी कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु महानगरपालिका आयुक्तांना याबाबत काहीच देणं घेणं नाही आहे. त्यांना जर विकास कामाबद्दल माहिती विचारली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच कुठलंही काम हे महापौरांच्या इशारवरच करत असल्याचे गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांवर केले.

कचरा साठवून ठेवलेल्या स्थळापासून तो कचरा त्वरित हटवा त्यासाठी मनपाला 10 दिवसाची मुदत अन्यथा कचरा संकलित केलेल्या ठिकाणी आंदोलन करण्याची चेतावणी खा.इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.