हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कडीपत्ता म्हंटल कि लगेच आठवत कि आपण त्याचा जास्त वापर हा भाज्यांमध्ये करतो.कडीपत्याला एक वेगळाच सुगंध असतो. सुगंधी वास येण्यासाठी काडिपत्याचा वापर केला जातो. कडीपत्ता आपण सहज फोडणीत टाकतो. बऱ्याच वेळा अनेकजण फक्त कडीपत्ता शोभेसाठीच टाकतात. पण कडीपत्ता जसा भाज्यांमध्ये टाकतात त्याच पद्धतीने त्याचे अनेक गुणधर्म आहेत. कडीपत्त्याला एक वेगळा सुगंध असतो. एक वेगळी चव असते . या बरोबरच कडीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पण अनेकजन अगदी सहजपणे कडीपत्याची पाने वेगळी करतात. काही जणांना कढी पत्ता हा खायला नाही आवडत.परंतु माहीत आहे का कडीपता अतिशय गुणकारी आहे. अनेक लोक भाज्यांमधील कडीपत्ता सहजरित्या बाजूला काढतात त्यामुळे लहान मुले सुद्धा कढीपत्ता खात नाहीत. एका संशोधनानुसार १०० ग्रॅम कडीपत्त्यामध्ये ६६ टक्के मॉइश्चर, ६.१ टक्का प्रोटीन१६ टक्के कार्बोहायड्रेट, ६. ४ टक्के मिनिरल वॉटर आढळून येते. इतके सगळे घटक असलेला कडीपत्ता पोटासाठी खूप फायदेशीर आहे.
कडीपत्ता ही वनस्पती अगदी सहजरीत्या कोठेही पाहायला मिळते. ती कोणत्याही मातीमध्ये सहज रित्या उगवते. कुंडीतही तुम्ही कडीपत्ता उगवू शकता. अनेक वेळा कडीपत्ता फोडणीतच का टाकत असतील हा देखील एक म्हत्वचा प्रश्न आहे. त्या पाठीमागचे कारण बऱ्याच लोकांना माहित नाही. त्यामुळे ते सहजरीच्या कडीपत्ता पदर्थातुन बाहेर काढून फेकून दिला जातो. त्यामागील हे कारण असे आहे की कडीपत्ता जेव्हा कडईत टाकला जातो ,तेव्हा तो चांगल्या प्रकारे तळाला जातो , या बरोबरच त्याचा संपूर्ण अर्क हा त्या पदार्थांमध्ये उतरतो. त्यामुळे कडीपत्ता हा फोडणीत टाकला जातो.
कडीपत्त्याची असणारे फायदे
अनेक वेळा शरीरात पित्ताचा त्रास जाणवू लागतो.पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर, कढीपत्ता हा त्याच्यावर रामबाण उपाय आहे.
मिरी, आले आणि सैंधव मिसळूनकढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत.याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.
कधी कधी शरीरात खूप मोठ्या प्रमाणात कफ होतो, कफ हा सुकून जातो ,अशा वेळेस कफ कमी करण्यासाठी कडीपत्ता खूप गुणकारी आहे.यासाठी कडीपत्याची पाने चांगल्या प्रकारे सुकवून त्याची पाऊडर बनवावी आणि ती मधा सोबत घ्यावी. दररोज हि पावडर मधासोबत घेतली तर कफाचा जो त्रास होतो तो नाहीसा होण्यास मदत होते. याचा कफ कमी होण्यासाठी मदत होते. कफ ही मोठी समस्या आहे. त्यावरयोग्य वेळी उपाय करणे जरूरी आहे. आयन आणि फॉलिक ऍसिड चा उत्तम स्त्रोत म्हणजे कडीपत्ता होय. आयन आणि फॉलिक ऍसिड जर शरीरात कमी असेल तर अनिमिया होण्याची शक्यता कमी असते.
कडीपत्ता हा अनेक औषधनासाठी उपयुक्त आहे. डायबीटीस असलेल्या लोकांसाठी कडीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी कडीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे ज्या लोकांना ब्लड शुगर याचा त्रास असेल अशा व्यक्तिनी आपल्या आहारात कडीपत्याचा समावेश करावा. यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर आणि कडीपत्याची पाने चावून खावीत. तसेच त्वचेच्या आजारासाठी सुद्धा कडीपत्ता गुणकारी आहे. त्याच्या पानाची पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावली असता. तुमच्या चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते. जर तुमचे केस खूप गळत असतील किंवा केसाच्या इतर काही समस्या असतील तर कडीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. खोबरेल तेल व त्यामध्ये कडीपत्याची पाने टाकून ते चांगल्या प्रकारे उकळून घ्यावे आणि त्याने केसांना मालीश करावी. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे ,केस तुटणे ,केस गळणे यासारख्या समस्यापासून सुटका मिळते. पानांची चटणी करुन ताकात पूड टाकून घेतली तर केसांच्या मुळांना पोषक ठरते. यांमुळे केस निरोगी व काळे राहतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’