कधी पहिला का ? 3D स्मशानभूमी

0
77
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी अमरावती| जगात नवनवीन प्रयोग केले जातात त्याचे प्रात्यक्षिके सुद्धा दाखविले जातात मात्र अमरावती जिल्यातील अंजनसिंगी गावात कोणताही प्रयोग न करता अफलातून तयार झालेलं 3D स्मशान तुम्ही कधी पाहिलं का? नाही ना!

अमरावतीतील ग्रामीण भागात असलेलं अंजनसिंगी गाव. या गावालगत १२ वर्ष जुनी स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच वैशिष्ट्य म्हणजे ही स्मशानभूमी मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या स्मशनाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला रस्त्यांनी जातांना ही स्मशानभूमी वेगवेगळ्या 3 बाजूनी वाकलेली दिसते. त्यामुळे स्मशानाकडे वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्यास स्मशान 3D असल्याचा भास होतो.

६ वर्षांपूर्वी याच परिसरात वादळ आलं होतं या वादळात गावातील घराचं मोठं नुकसान झालं होतं त्यावेळी या स्मशानभूमीचे लोखंडी रॉड सुद्धा वाकले तेव्हापासून त्याच रूप बदललं. स्मशानभूमी सरळ रेषेत उभं असता ती सरळ दिसते तर डाव्या बाजूला सकरल्यास ती उजव्या बाजूला वाकलेली दिसते. त्यामुळे ही स्मशानभूमी या परिसरात कुतूहल आणि आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here