कराडात पुन्हा गोळीबार, १२ राऊंड फायर करुन युवकाची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराडातील पवन सोलवंडे खून प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विकी लाखे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव असून या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, रात्री १० च्या सुमारास आगाशिवनगर परिसरात जॅकवेल कडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असलेल्या विकास लाखे या युवकावर दोन दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात सहा जणांनी गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांनी वेगवेगळ्या बंदुकीतुन १० ते १२ राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. यामध्ये विकी लाखे नावाचा युवक जागीच ठार झाला. जुगार खेळत असताना झालेल्या वादातून हा गोळीबार झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन दुचाकिंवरुन आलेल्या सहा हल्लेखोरांनी हा हल्ला केला.

दरम्यान गोळीबार करुन हल्लेखोर फरार झाले असून कराड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच हल्लेखोरांचे कारणही अद्याप अस्पष्ट असून कराड पोलिस त्यांचा तपास करत आहेत. गोळीबाराच्या घटनेमुळे आगाशिवनगर- मलकापुर परिसरात रात्री तणाव निर्माण झाला होता.