काँग्रेसकडून अकोला जिल्ह्यात ‘या’ दोघा नवोदितांना मिळाली संधी

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी। अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठा समजला जाणारा अकोला पूर्व या मतदार संघातून नव्याने काँग्रेसमध्ये सामील झालेले विवेक पारसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोट विधानसभा जागेसाठी काँग्रेसचे माजी मंत्री रामदास बोडखे यांचे पुत्र संजय बोडखे यांना उमेदवारी देण्यात आली. अकोला जिल्ह्यात एकूण पाच मतदार संघ असून आणखी तीन मतदार संघाची घोषणा आघाडी कडून होणे बाकी आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अकोल्यातील चारही आमदारांना पुन्हा संधी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. तर शिवसेनेने बाळपूर मतदारसंघात जाहीर केलेल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. तेव्हा युतीने जिल्ह्यातील पाचही उमेदवारांची घोषणा केली असून वंचितने तीन मतदार संघातील उमेदवार निश्चित केले आहेत.

अकोल्यात काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेले दोनही उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत तर युतीचे उमेदवार मात्र विद्यमान आहेत. त्यामुळे अकोला पूर्वमधील जनता विद्यमानांनाच पुन्हा संधी देते की नवीच चेहरे अजमावते याची सर्वाना उत्सुकता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here