कोरोनामुळे बुद्धिबळ खेळाडू जगज्जेता विश्वनाथ आनंद अडकला जर्मनीत

0
125
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | करोना व्हायरसमुळे सध्या देशात नव्हे तर देशभरात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा फटका हा सगळ्यांचा बसतोय त्यात आता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे नाव सुद्धा समाविष्ट झाले आहे.बुंडेसलीगा चेसमध्ये पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला विश्वनाथन आनंद,जो सध्या एससी बॅडेनसाठी खेळत होता, तो सध्या जर्मनीमध्ये असून आता हा इव्हेंटही कॅन्सल करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विश्वनाथ आनंदला भारतात परतण्यात अडचणी येत आहेत.

आज आनंद भारतात परतणं अपेक्षित होतं. मात्र भारतासह जगभरातील वाढता प्रादुर्भाव पाहता विश्वनाथन आनंद यांनी जर्मनीतच राहणं पसंत केलं आहे.कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर अनेक रद्द करण्यात आल्या आहेत.

विश्वनाथनच्या पत्नीने सांगितले की, ‘मला फार भीती वाटत आहे की, तो तिकडे आहे. परंतु, मला याहीगोष्टीचा आनंद आहे की, त्यांची प्रकृती उत्तम आहे. मी फक्त प्रार्थना करत आहे की, या महिना अखेरपर्यंत त्यांनी भारतात परत यावे.’ तसेच जर्मनीतून आनंद इंटरनेटमार्फत मित्र आणि कुटुंबियांसोबत चॅट करत आहे. एवढचं नाहीतर आपला मुलगा आणि पत्नीसोबत तो व्हिडीओ कॉलवरही संपर्कात आहे.

दरम्यान, जगभरात आतापर्यंत ६५१५ लोकांचा मृत्यू झाला आहे.कोरोना व्हायरसमुळे चीननंतर इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मागील २४ तासांमध्ये ३६८ जणांचा मृत्यूल झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here