हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बाळंतपणाच्या वेदना या कुणालाही सांगून समजणाऱ्या असतात. मातृत्व अनुभवणाऱ्या महिलेसाठी जगण्या-मरण्याचा हा प्रसंग परिक्षा पाहणारा असतो. छत्तीसगडमधील दुर्गम भागात अडकलेल्या महिलेला अशाच संकटातून बाहेर काढण्यात सीआरपीएफच्या जवानांनी मोलाचं योगदान बजावल्याची प्रेरणादायी घटना मंगळवारी समोर आली आहे.
Chhattisgarh: A team of Central Reserve Police Force (CRPF) carried a pregnant woman on a cot for at least 6 km through the jungles of village Padeda in District Bijapur today morning, to help her reach hospital. pic.twitter.com/tiMaOGI5jh
— ANI (@ANI) January 21, 2020
विजापूर जिल्ह्यातील पाडेदा गावात मंगळवारी सकाळी एका महिलेला प्रसूतीवेदना होत असताना तिथेच उपस्थित असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी झोळी करत या महिलेला दवाखान्यापर्यंत पोहचवलं. जंगलभागातून ६ किलोमीटरची पायपीट करत या जवानांनी महिलेला सुखरूप दवाखान्यात पोहचवलं.
या कामगिरीबद्दल सीआरपीएफच्या जवनांचं कौतुक केलं जात आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बीएसएफच्या जवानांनी केलेली मदतही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News’‘