परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
लॉकडाऊन काळात चोरून लपून पुणे,मुंबई, औरंगाबाद येणारे व्यक्ती ,नातेवाईक व इतर लोकांना आश्रय देत माहिती लपवून ठेवली असेल तर अशा परभणी जिल्हातील लोकांविरूध्द आपती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतीबंधक अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या चोरुन लपून येणाऱ्या व्यक्ती बद्दल प्रशासनाला माहीती देणे शहाणपणाचे ठरणार आहे. दोन दिवसापूर्वी परभणी शहरात आलेल्या व कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांला आश्रय देणाऱ्या नातेवाईकांविरोधात नवामोंढा पोलीस ठाण्यात असा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
कोविड १९ संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यात मागील २२ एप्रिलपासून जिल्ह्याच्या सीमेवर १५ ठिकाणी नाकाबंदी पॉइंट लावुन पूर्ण जिल्हयाची सीमा सिल करण्यात आल्या आहेत . तरीही चोरीच्या मार्गाने काही लोक मुंबई , पुणे , औरंगाबाद येथुन परभणी जिल्हयात प्रवेश करीत आहेत. दि. १६ एप्रिल रोजी कोव्हीड १९ चा संसर्ग झालेला रूग्ण आढळला आला असून त्याने पुणे येथुन मोटार सायकलने प्रवास केला व एमआयडीसी परभणी येथे त्याच्या नातेवाईकाकडे वास्तव्यास राहिला होता. त्यामुळे त्याच्या विरूध्द व सदरील रुग्णांस आश्रय दिलेल्या नातेवाईक यांचे विरूध्द कलम १८८, २६९, २७० भा.दं.वि व ५१ आपत्ती व्यवस्थापन कायदयान्वये पोलीस ठाणे नवामोंढा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दरम्यान कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर व समूहांवर जिल्हाभर कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात तोंडावर मास्क, रूमाल न बांधता विनाकारण मोटार सायकलवर फिरतांना पोलीस ठाणे पाथरी अंतर्गत एका बोलेरो वाहनामध्ये फिरतांना मिळुन आलेले व्यक्तीविरूध्द आपत्ती व्यवस्थान कायदयान्वये दोन गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकत्र न जमता सोशल डिस्टन्स ठेवण्याचे प्रतिबंधात्मक आदेश लागु असतांना सुध्दा सेलु शहरातील एका घरी आदेशाची अवहेलना करुन लोकांच्या जिवीतास धोका होईल अशा रितीने एकत्र जमुन १८ लोकांनी प्रार्थना केली म्हणुन त्यांच्या विरूध्द कलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम २, ३, ४ साथरोग प्रतीबंधक अधिनियम व कोव्हीड १९ उपाययोजना अधिनियम कलम ११ नुसार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास चालु आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी संचारबंदी उल्लंघन करत रस्त्यावर मास्क किंवा रूमाल बांधल्या शिवाय सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरतांना मिळून आल्यास त्यांचे विरूध्द यापुढे ही कायदेशिर कारवाई करण्यात येईल तसेच पुणे, मुंबई, औरंगाबाद येथुन चोरून लपुन येणारे इसमास नातेवाईक अगर ईतर लोकांनी आश्रय देवुन माहिती लपवुन ठेवली तर त्यांचे विरूध्द आपती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतीबंधक अधिनियमा नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”